‘एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा’, दरेगाववाले बाबा म्हणत कुंभमेळ्यात जाण्याचा संजय राऊतांनी दिला सल्ला

Sanjay Raut On Eknath Shinde | महायुतीच्या पालकमंत्री पदाची यादी 18 जानेवारी रोजी जाहीर झाली. मात्र आता पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद समोर आले आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाल्यानंतर या दोन्ही जिल्हयाच्या निर्णयाला स्थगित देण्यात आली.
नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यावरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. यानंतर एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील दरे गावात गेले आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने तातडीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना पाठवलं आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकावरसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा
संजय राऊत म्हणाले की, “खाते वाटपाला विलंब झाल्यानंतर आता पालकमंत्री जाहीर केले तर धुसफूस सुरु आहे. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. आमचे ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना राग आला की ते आपल्या दरेगावाला जातात. दरे हे एकनाथ शिंदे यांचे दावोस आहे. एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी कुंभमेळ्यात जावं. आयआयटीवाले बाबा पाहिले आता आपण दरेगाववाले बाबा पाहू, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. Sanjay Raut On Eknath Shinde |
पुढे ते म्हणाले, “तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर , लोकांच्या मुळावर येतेय. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी” असा खोचक सल्ला ही राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला. Sanjay Raut On Eknath Shinde |
…तेव्हाच हा ‘उदय’ होणार होता
राज्यात आणि शिंदे गटात नवा ‘उदय’ होणार होता, असं सांगितलं जात आहे, त्याबाबत प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, “उदय सामंताचं नाव घ्या ना. मुख्यमंत्री फडणवीस हे उदय सामंत यांना दावोसला घेऊन गेले आहेत. सरकार स्थापन होण्याच्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे रुसून बसले होते. त्यावेळी उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार होते. तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं,” असा संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपला लगावला टोला
पुढे संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला वाटत असेल उद्धव ठाकरे संपले ते कधीही संपले नाहीत. काँग्रेसने स्वतः कडे बघावं. तर भाजप भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे जीवन आणि राजकारण आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. Sanjay Raut On Eknath Shinde |
हेही वाचा:
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा भारतीय क्रिकेटपटूंच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार का?





