Sangram Jagtap : “संग्राम को दो दिन के अंदर…..”; अजित पवारांच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

Sangram Jagtap receives death threat : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानमधील गैरहिंदू समाजाविरोधात काढलेल्या मोर्चामुळे ते अधित चर्चेत आले होते.
त्यानंतर त्यांना जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ याच्या मोबाईलवर आला होता. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा कोतवाली पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री त्यांचे खासगी खासगी स्वीय सहाय्यक यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’, असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी घेतलेल्या हिंदुत्वासंदर्भातील भूमिकेमुळे त्यांना ही धमकी आली की अन्य काही कारण जीवे मारण्याच्या धमकीमागे होते, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा : बिहार निवडणुकीपूर्वी मोदी-नितीशकुमारांच्या पोस्टर्सवर विरोधकांची टीका ; म्हणाले, “निवडणुकीनंतर…”




