Sangli Crime : मिरजेत पाठलाग करत २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गुन्हेगारीच्या एका नव्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Sangli Crime : मिरज शहरातील टाकळी रोडवर पूर्ववैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत एका तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शिवप्रसाद अथणीकर (वय २८, रा. टाकळी रोड, मिरज) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Sangli Crime)
जखमी शिवप्रसाद मोटारसायकलवरून येत असताना अज्ञात चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर करून शिवप्रसादवर अचानक हा हल्ला केला. (Sangli Crime)
हल्ला इतका तीव्र होता की, शिवप्रसाद जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला. सध्या शिवप्रसादवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Sangli Crime)
रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदार दाखल झाले होते. (Sangli Crime)
उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमी तरुणाच्या मित्र परिवार व नातेवाइकांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. (Sangli Crime)
पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. संशयित हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (Sangli Crime)
पूर्व वैमनस्य कारणीभूत?
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्वीच्या वादातून व वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हल्लेखोर कोण आहेत, त्यांची संख्या किती होती आणि नेमके कोणते वैमनस्य होते, याबाबत पोलीस सध्या चौकशी करत आहेत. (Sangli Crime)
जखमी शिवप्रसादची प्रकृती स्थिर होताच त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिरज शहरात अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात आणखी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. (Sangli Crime)





