Ranjangaon Mahaganapati: रांजणगाव महागणपती मंदिराचा गाभारा १५ एप्रिलपासून तीन महिने बंद
Ranjangaon Mahaganapati: भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ranjangaon Mahaganapati: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव महागणपती मंदिर येथे भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्यासह अंतर्गत भागात दुरुस्ती व संवर्धनाची कामे हाती घेण्यात येत असल्याने गाभारा दिनांक १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.
ही माहिती पुरातत्त्व विभागाकडून अधिकृतपणे देण्यात आली असून, या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात प्रत्यक्ष प्रवेश करून दर्शन घेता येणार नाही. मात्र, भाविकांसाठी पर्यायी दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या संदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विलास वहाने यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने ही कामे अत्यावश्यक आहेत.
दरम्यान, भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा -सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा माळेगाव बुद्रुकमध्ये मंगळवारी शुभारंभ





