Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ माळेगाव बुद्रुक येथे मंगळवार, १४ एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी ९ वाजता गावातील भैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ४ मे २०२६ रोजी पार पडणार आहे. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने या निवडणुकीत लढत अधिक थेट झाली आहे. Baramati By-election प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक पातळीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ.आर.पी.पेक्षा अधिक दर देत केलेल्या देयकांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच यशस्वी गळीत हंगाम, वीज व इथेनॉल उत्पादन आणि विविध विकासकामांमुळे कारखान्याच्या कार्याचा सकारात्मक परिणाम परिसरात दिसून येत आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विकास उपक्रमांची पूर्तता करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले आहे. माळेगाव बुद्रुकमध्ये दिसत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या संख्येने मतदान होऊन सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.