Supriya Sule : भारतीय सैन्याला मानाचा मुजरा; अॅापरेशन सिंदूरचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Supriya Sule : भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करुन दिले आहे. या कारवाईला अॅापरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले होते. तिन्ही दलांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. भारताने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्व भारतवासीयांकडून कौतुक केले आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशासोबत आहेत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेले ड्राफ्टींग अप्रतिम आहे, ते सगळ्यांनी वाचा असे सुळे यावेळी म्हणाल्या. भारताने सांगितल आहे की, हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केले नाही, असे देखील सुळे म्हणाल्या.
हा देश गांधींच्या मार्गावर चालतो
हा देश महात्मा गांधींच्या मार्गावर चालतो ज्यांच्या घरात ही दुर्देवी गोष्ट झाली आहे. ज्यांना वीरमरण आलं. त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाविरोधात आहे हे भारताने सांगितल आहे. युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक आहे राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं.
ही टीका करण्याची वेळ नाही
खासदार सुप्रिया सुळे यांनी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सरकारचे कौतुक केले. राजनाथ सिंह यांचं आणि सरकारच कौतुक करायला हव असे म्हणत ही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही आम्ही सगळ बैठकीत सांगितलं होतं, असे देखील त्या म्हणाल्या.





