Nagar | महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतनासहित खात्यावर पगार जमा

नगर, प्रतिनिधी – महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या ८ वर्षापासून प्रलंबित होता. हा मार्गी लागावा यासाठी आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रयत्न केले.
त्यानुसार राज्य सरकारने मंजुरी देखील दिली असून, महापालिका प्रशासनाने मनपा कर्मचाऱ्या संदर्भात कागदपत्राची पडताळणी सुरू केली आणि ऑक्टोबर महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग लावून खात्यावर पगार जमा केला.
त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
याचबरोबर दिवाळीला दिले जाणारे सानूग्रह अनुदान लवकर दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगासहित पगार जमा केल्याबद्दल मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर, राहुल साबळे, बलराज गायकवाड, दिपक मोहिते, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, ऋषिकेश भालेराव, संदिप चव्हाण, नंदकुमार नेमाणे, अमोल लहारे, राकेश गाडे, अनंत लोखंडे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





