‘सैयारा’चा धडाक्यात प्रवास सुरूच, 19व्या दिवशीही नवीन चित्रपटांवर मिळवली आघाडी

Saiyaara Box Office Collection: मोहित सूरी दिग्दर्शित आणि अहान पांडे, अनीत पड्डा अभिनीत ‘सैयारा’ ही रोमँटिक लव्ह स्टोरी सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजत आहे. रिलीजनंतर 19 दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांनाही मागे टाकत ‘सैयारा’ने पुन्हा एकदा जोरदार कमाई केली आहे.
19व्या दिवशी एवढी झाली कमाई
मंगळवारी म्हणजेच चित्रपटाच्या 19व्या दिवशी ‘सैयारा’ने तब्बल 2.32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापूर्वी सोमवारी चित्रपटाने 2.35 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. या कामगिरीनंतर चित्रपटाचा एकूण कलेक्शन 304.42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
300 कोटींचा टप्पा पार
‘सैयारा’ने आपल्या पहिल्याच दिवशी 21.5 कोटी रुपयांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या चार दिवसांतच 100 कोटींचा आकडा पार करणाऱ्या या चित्रपटाने एक आठवड्यात 172.75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात अजून 107.75 कोटी जोडले गेले. तिसऱ्या आठवड्यातही कमाई सुरूच असून, एकूण कमाईने 304.42 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
नवीन चित्रपटांपेक्षा ‘सैयारा’चा टॉप गियर
सध्या ‘सैयारा’सह ‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘धडक 2’ हे चित्रपटही प्रदर्शित आहेत. मात्र, हे नवीन चित्रपट ‘सैयारा’च्या यशापुढे फिके पडले आहेत. मंगळवारी ‘धडक 2’ ने 1.60 कोटी, तर ‘सन ऑफ सरदार 2’ ने 2.50 कोटींची कमाई केली, आणि त्याच दिवशी ‘सैयारा’ने देखील 2.50 कोटी रुपये कमावले.
वर्ल्डवाइड कलेक्शन 500 कोटींच्या पार
फक्त देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘सैयारा’ने मोठं यश मिळवलं आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये हा चित्रपट आतापर्यंत 502.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकला आहे. त्यामुळे अहान पांडे आणि अनीत पड्डा हे दोघंही आता बॉलीवूडमधील नवे सेंसेशन ठरले आहेत.
‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवरील हा प्रवास अजून किती दिवस चालतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.



