‘सैयारा’ चित्रपट पाहून बॉबी देओलला अश्रू अनावर; अहानच्या बालपणीच्या आठवणीत भावूक
Bobby Deol | ‘सैयारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या अभिनयाचे देखील अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
हा चित्रपट पाहून अनेकजण थिएटरमध्ये रडत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातच आता अभिनेता बॉबी देओलला देखील अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बॉबी देओल अहान पांडेच्या दमदार सुरुवातीमुळे खूप आनंदी आहे.
चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहिला तेव्हा बॉबी आपले अश्रू रोखू शकला नाही. कारण अहान त्याच्यासमोर लहानाचा मोठा झाला आहे. त्याचं यश पाहून त्यालाअश्रू रोखता आले नाही. बॉबीला अहानचे बालपणही आठवले. जेव्हा अहान लहान होता आणि स्पायडरमॅनचा पोशाख घालून, तो पंचिंग बॅगवर पंचिंग करत असे, अशी आठवण त्याने सांगितली. Bobby Deol |
अहानने 8 वर्षे वाट पाहिली
अहान पांडेला बॉबी मुलासारखं मानतो. त्यामुळे त्याच्या पदार्पणाबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला की “माझ्या मुलाने चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे. अहानने ‘सैयारा’च्या प्रदर्शनासाठी 8 वर्षे वाट पाहिली.” बॉबी देओलने अहानला हा चित्रपट कसा मिळाला हे देखील सांगितले. Bobby Deol |
त्याने सांगितले की त्यामागे एक अद्भुत कथा आहे. अहानने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. त्याच्या यशासाठी तो खूप आनंदी असल्याचं बॉबीने म्हटलं. त्यामुळे बॉबीने सांगितले की तो हा चित्रपट पाहताना खूप रडला. दरम्यान, बॉबी देओलने ‘सैयारा’चा दिग्दर्शक मोहित सुरीचं आणि कलाकारांच्या भूमिकेचेही कौतुक केले. Bobby Deol |
हेही वाचा :





