पुणे जिल्हा | सैनिक हो तुमच्यासाठी चैतन्यचा उपक्रम

ओतूर, (वार्ताहर) – येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थीनींनी सीमेवर लढणार्या जम्मू-काश्मीर लडाख भागामध्ये रक्षाबंधनानिमित्त खास कार्यानुभवाच्या तासाला बनवलेल्या राख्या पाठवल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
या उपक्रमासाठी शरद माळवे, मंगेश तांबे, प्रमोद जाधव, राजाराम शिंदे,मिलिंद खेत्री, विशाल चौधरी, संतोष कांबळे, वनिता भोर, आसावरी गायकर, देवचंद नेहे, लक्ष्मण दुडे, अमित झरेकर, सोनाली माळवे, आशा गाडेकर,
सोनाली कांबळे, आशा डुंबरे, अश्विनी नलावडे, सुजाता राऊत, हर्षल शितोळे, तनुजा थोरात, प्रमिला डोंगरे, साक्षी देशमुख, सौरभ ढमाले, अनुराधा इसकांडे, विजय खरात, प्रसन्ना तांबे,मयूर जाधव, ईश्वर ढमाले,
योगेश फापाळे, अरविंद आमरे, तेजस ढमाले, दीपक हांडे यांचे सहकार्य मिळाल्याचे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब खाडे यांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे,रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, संजय हिरे, अनिल उकिरडे आदींनी कौतुक केले आहे.





