ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील कोळमाथा येथे नंदलाल लॉन्ससमोर स्विफ्ट कार (क्रमांक एमएच १२, एमएल ०९०२) पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज (दि. २७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. वरद एकनाथ तांबे (रा.ओतूर) व श्रेयस लक्ष्मण पवळे (रा. पिरंगुट) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अभिनव गणेश वाकचौरे व ओंकार गोरक्ष शिंदे (रा. साकूर मांडवे, ता. संगमनेर) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.Accident News चालकाला डुलकी लागल्याने अपघात ? चालकाला पुरेशी झोप मिळाली नसल्यामुळे डुलकी येऊन अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे चारही तरुण अत्यंत सोज्वळ आणि कामकाजी असल्यामुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर वाहन कार रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. या अपघाताबाबत ओतूर पोलिस पुढील तपास करीत आहेत. हेही वाचा : Santos Costa : “मी देखील प्रवासी भारतीय नागरिक,” ; ईयू कौन्सिलचे अध्यक्ष सॅंटोस कोस्टा यांनी मोदींना दाखवला भारतीय पासपोर्ट