Sai Tamhankar | सई ताम्हणकरची IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये एन्ट्री

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अभिनयासह सई तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये ती पाहायला मिळते. यातचा आता IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये सईने बॉलिवूड स्टार्ससोबत अव्वल स्थान मिळवले आहे.
बॉलिवूडमध्ये तिच्या कामाच्या चर्चा नेहमीच चर्चा असते. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप 10 लिस्टमध्ये सई 10 व्या क्रमांकावर आहे. बॉलिवूड मधल्या अनेक बड्या स्टार्स ना मागे टाकत सई IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. Sai Tamhankar |
सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती बॉलिवूडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स करणार असून क्राईम बीट, डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग सारख्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्याच्या या चित्रपटांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. Sai Tamhankar |
हेही वाचा:
Sharad Pawar : पाठीवर कौतुकाची थाप बसली अन्…..; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा





