अभिनेत्री सई लोकूरने गणेशोत्सवानिमित्त शेअर केले खास फोटो

Sai Lokur | गणरायांचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटी दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अभिनेत्री सई लोकूरच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या आगमनानंतर कुटुंबासोबतचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे.
सई लोकूरने तिच्या घरच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना घडवलं आहे. गणरायाची सुंदर मूर्तीसोबत सईने बाप्पासाठी खास सजावटही केली आहे. सईने कुटुंबीयांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या लेकीची झलक पाहायला मिळत आहे. सईच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा झाले आहेत. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘मी आणि यू’, ‘कीस किसको प्यार करु’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यामुळे सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र सध्या ती सिनेसृष्टीपासून लांब असल्याचे दिसते. Sai Lokur |
हेही वाचा :





