Girija Oak Photo: लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले गिरीजा ओकचे सौंदर्य; बोल्ड लुकवर चाहते फिदा
Girija Oak Photo: सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Girija Oak Photo: अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोलेचा मोठा चाहता वर्ग आहे. नॅशनल क्रश म्हणून तिला मोठी लोकप्रियता मिळाली असून, ती आपल्या हटक्या स्टाइलसाठी नेहमीच कायम चर्चेत असते. गिरीजा ओकने आपल्या लूक्सने कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. तिच्या फोटोशूटची सोशल मीडियात कायम चर्चा होत असते. अलिकडेच अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्रीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. गिरीजा ओकने सोशल मीडियात आपले लेटेस्ट फोटोस शेअर केले आहेत. हाय स्लिट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे.
या लाल रंगाच्या ड्रेसवर गिरिजाने ओपन शॉर्ट हेअरस्टाइल ठेवली आहे. तिचा मनमोहक लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिने केवळ इअररिंग्स घातले आहेत. कमी अॅक्ससेसरीजमध्येही तिचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. तिने या ड्रेसवर एकापेक्षा एक सुंदर पोज दिले आहेत. Girija Oak Photo
View this post on Instagram
चाहत्यांसह कलाकारांकडून कौतुक
गिरीजाचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिरीजाच्या पोस्टवर मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापट हिने गिरीजाच्या पोस्टवर ‘चिकनी’ अशी कमेंट केली आहे. तसेच ‘नॅशनल क्रश उगीच नाही म्हणत’, ‘रेड सिझलिंग क्वीन’, अशा कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, गिरीजाने आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने उत्कृष्ट काम केले आहे. Girija Oak Photo
हेही वाचा :





