“भारतावर अणुबॉम्ब टाका अन्…” ; अमेरिकन शाळेतील हल्लेखोराच्या बंदुकीवर धक्कादायक मजकूर, ट्रम्पचाही उल्लेख

Minneapolis Shooting। अमेरिकेतील मिनियापोलिस येथील एका कॅथोलिक शाळेत दहशतवादी हल्ला झाला. सुरुवातीच्या तपासानंतर, एफबीआयने या गोळीबाराला दहशतवादी घटनेशी जोडले आहे. या हल्ल्यामागे देशांतर्गत दहशतवाद आणि धार्मिक द्वेष असल्याचे म्हटले आहे.
मिनियापोलिसच्या शाळेत बुधवारी झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली. प्रार्थनेदरम्यान चर्चच्या खिडक्यांमधून आत बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात २ मुले मृत्युमुखी पडली तर १७ हून अधिक लोक जखमी झाले. नंतर हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.
न्यूके इंडियाचा अर्थ काय? Minneapolis Shooting।
न्यूके इंडिया आणि माशा अल्लाह असे गोळीबार करणाऱ्याच्या बंदुकीवर ट्रम्प यांच्याबद्दल शब्द लिहिले होते. ‘डोनाल्ड ट्रम्पला मारा’ असे लिहिले होते, तसेच इस्रायल कोसळले पाहिजे असे संदेशही लिहिले होते. “न्यूके इंडिया म्हणजे अण्वस्त्रांनी भारतावर हल्ला करा” असे मानले जाते की गोळीबार करणारी व्यक्ती काही कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणीने प्रभावित असल्याचे म्हटले जात आहे.
हल्ल्यापूर्वी पोस्ट केलेला व्हिडिओ
हल्ल्यापूर्वी वेस्टमनने त्याच्या नावाने एका यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केले होते. व्हिडिओमध्ये त्याने रायफल, शॉटगन आणि पिस्तूल यासारख्या शस्त्रांचा साठा दाखवला होता. तो म्हणाला होता की हे छोटे शस्त्र माझ्यासाठी आहे, गरज पडल्यास ते वापरले जाईल. शस्त्रांवर लिहिलेल्या घोषणा त्याच्या कट्टरपंथी मानसिकतेला प्रकट करतात. व्हिडिओमध्ये त्याने दोन जर्नल्सचा उल्लेख केला, त्यापैकी एक 60 पानांचे आणि दुसरे 150 पानांचे होते, जे पूर्णपणे सिरिलिक भाषेत लिहिलेले होते. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हे जर्नल त्याच्या हिंसक विचारसरणीचा आणि द्वेषाचा पुरावा आहे.
ट्रान्सजेंडर ओळख आणि राजकीय दृष्टिकोन Minneapolis Shooting।
रॉबिन वेस्टमन एक ट्रान्सजेंडर होते. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर हक्कांवर प्रतिबंधात्मक निर्णय घेतले होते. असे मानले जाते की या धोरणांमुळे वेस्टमनमध्ये अधिक राग निर्माण झाला. शस्त्रांनी ट्रम्पला मारण्याची धमकी देखील त्याचा राजकीय विरोध दर्शवते.





