Sahitya Parishad Election: मसाप निवडणुकीत पुण्यात रस्सीखेच
Sahitya Parishad Election: अन्य सर्व जिल्हा प्रतिनिधींची बिनविरोध निवड

Sahitya Parishad Election: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुणे वगळता अन्य सर्व जिल्हा प्रतिनिधींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामुळे आता पुण्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक कार्यवाह पदाच्या दोन जागांवरील चारुदत्त निमकर आणि विनायक आंबेकर यांनी माघार घेतली आहे. आंबेकर यांनी याआधी कोषाध्यक्ष पदावरूनही माघार घेतली होती. त्यामुळे आता आंबेकर एकाही पदासाठी निवडणूक लढवत नाहीत.
सातारा जिल्हा प्रतिनिधीपदासाठी अर्ज दाखल केलेले तुषार महामुलकर, धुळे जिल्हाप्रमुख म्हणून सुरेंद्र मोरे आणि सदाशिव सूर्यवंशी आणि नाशिक जिल्हाप्रमुखपदी अर्ज दाखल केलेले सुदाम सातभाई अशा एकूण सहा जणांनी माघार घेतली आहे.
यामुळे पुणे वगळता अन्य सर्व शहरातील शाखांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, स्थानिक कार्यवाह आणि पुणे जिल्हाप्रमुख या पदांसाठी थेट निवडणूक होणार आहे.
यांच्यात होणार लढत






