भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली अन्
Updated On:

सोलापूर – भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली अन् मोकळी झाली. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर केली आहे. ते सोलापूरात माध्यमांशी बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठरलेले लग्न मोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर पळून गेली.शिवसेना – भाजपमहायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यामध्ये जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला.
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली अन् मोकळी झाली. अशी जोरदार टीका खोत यांनी सेनेवर केली आहे.





