राजस्थान काँग्रेसमधील मनभेद कायम; गेहलोतांनी पायलट यांना पुन्हा डिवचलं

जयपूर – राजस्थानमधील कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. पायलट यांनी मध्यंतरी गेहलोत यांच्या विरोधात बंडही केले होते.
मात्र, ते फसले. पण तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये असलेला तणाव तसूभरही कमी झालेला नाही. त्याला कारण तेव्हा गेहलोत यांनी पायलट यांना निकम्मा म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा पायलट यांचे नाव न घेता त्यांना निकम्मा म्हटले आहे.
गेहलोत म्हणाले की, कधी कधी दोन शेजाऱ्यांच्या मुलांची भांडणे होतात. एक शेजारी दुसऱ्याकडे त्याच्या मुलाची तक्रार करायला जातो. तेव्हा तो काय म्हणतो… माझा मुलगा काही नालायक आहे. काही कामाचा नाही (निकम्मा) आता त्याला बोलावून रागवतो. हे तो सहज बोलतो. आपला मुलगा अजून लहान आहे. त्याने चूक केली असेल, अशी भावना त्याची असते.
…तेव्हा मोदींना पदावर ठेवून भाजपने चूक केली – यशवंत सिंन्हांचे वक्तव्य
मी कधी कधी चिडल्यावर माझ्या मुलांना निकम्मा म्हणतो. मात्र, काही लोकांना त्याचा राग येतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गेहलोत यांच्यासंदर्भात बोलताना सचिन पायलट म्हणाले होते की अशोक गेहलोत त्यांच्या पित्यासमान आहेत व त्यांच्या कोणत्याच गोष्टींचा त्यांना राग येत नाही. हाच धागा पकडून आता गेहलोत यांनी पायलट निकम्मा तर म्हटले आहेच, पण बच्चाही म्हटले आहे.




