पुणे – महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला बरखास्त केल्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. खेळ कोणताही असो त्यात राजकीय हस्तक्षेप नको, असे मत व्यक्त करत पवार यांनी परिषदेतील घडत असलेल्या घटनांवर थेट भाष्य करणे टाळले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर त्याचा संबंध महाराष्ट्रातील सत्ता बदलाशी जोडला जात आहे. त्यावर पवार यांनी आपले मत मांडले आहे. परिषदेने महासंघाच्या तक्रारींकडे तसेच सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे हे घडले.
मी परिषदेच्या बैठकांना उपस्थित नसतो. क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी सुविधा पुरवणे हे माझे काम आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना मदत करणे तसेच राज्य, राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे हे परिषदेचे काम आहे. ते परिषदेकडून होत नसल्याचेही समोर येत आहे. मात्र, कोणत्याही क्रीडा संस्थेत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असेही पवार म्हणाले.