SA vs WI : द. आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिका विजय, भारतासह ऑस्ट्रेलियाचाही मोठा विक्रम काढला मोडित….

South Africa vs West Indies : दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज संघाचा 40 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेसाठी चमकदार कामगिरी केली. याच कारणामुळे त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्याची कसोटी मालिका 1-0 ने जिंकून इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिकेने मोडला भारताचा विक्रम…
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 10वी कसोटी मालिका जिंकली आहे. यासह दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका संघाविरुद्ध सलग 10 कसोटी मालिका जिंकणारा पहिला संघ बनला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारत आणि ऑस्ट्रेलियाचे विक्रम मोडीत काढले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
Winning is what we do! 🇿🇦
South Africa’s test series win yesterday was the 10th consecutive win against the West Indies! ✨
The Proteas made us so proud with an incredible team effort and clinical bowling when it mattered! 👏
Well done once again.#WozaNawe #BePartOfIt#SAvWI pic.twitter.com/bwniEGNyo3
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 18, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग मालिका जिंकणारे संघ…
दक्षिण आफ्रिका विरूध्द वेस्ट इंडिज : सलग 10 मालिका विजय (1998-2024)
भारत विरूध्द वेस्ट इंडिज : सलग 9 मालिका विजय (2002-2023)
ऑस्ट्रेलिया विरूध्द वेस्ट इंडिज : सलग 9 मालिका विजय (2000-2022)
SA vs WI : दक्षिण अफ्रिकेनं वेस्ट इंडिजला लोळवलं; दुसरी कसोटी जिंकत मालिकेवरही केला कब्जा…
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 160 धावांत गारद झाला. त्यानंतर पहिल्या डावात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डावही 144 धावांवर आटोपला. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या डावात वेस्ट इंडिज संघासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघाला 222 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.





