SA vs WI : गयाना कसोटीचा नकोशा विक्रमाच्या यादीत झाला समावेश…! जाणून घ्या, WI vs SA यांच्यातील दुसऱ्या सामन्यात नेमकं काय घडलं…..

South Africa vs West Indies 2nd Test Match : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला, तर गयानाच्या मैदानावर खेळलेला दुसरा कसोटी सामना अवघ्या 3 दिवसात संपला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या, दुसऱ्या दिवशी 8 आणि तिसऱ्या दिवशी 15 विकेट पडल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा सामना 40 धावांनी जिंकला ज्यामध्ये विआन मुल्डरने आपल्या अष्टपैलू खेळाने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय केशव महाराजाची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. त्याचवेळी, गयाना कसोटी सामन्याचा आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील खराब (नकोसा विक्रम) यादीत समावेश झाला आहे.
1 नव्हे तब्बल 11 फलंदाज शून्यावर माघारी…
गयाना येथे दक्षिण आफ्रिका विरूध्द वेस्टइंडिज याच्यांत झालेल्या दुसऱ्या सामन्यात आणि एकंदरच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 14व्यांदा एका सामन्यात एकूण 11 खेळाडू खाते न उघडता (शून्यावर) पॅव्हेलियनमध्ये परतल्याचे पाहायला मिळाले.
It wasn’t easy to score in Guyana 👀
11 batters fell without scoring in the second #WIvSA Test 🦆 https://t.co/Hxx4QWLSHh pic.twitter.com/3Ft25ChOYp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 18, 2024
या कसोटी सामन्यात दोन्ही डावांसह वेस्ट इंडिज संघाचे एकूण 4 खेळाडू आपले खाते उघडू शकले नाहीत, तर दक्षिण आफ्रिका संघाचे 7 खेळाडू शून्य धावसंख्येसह पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात दोन्ही संघांकडून चमकदार गोलंदाजी पाहायला मिळाली ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने एकूण 9 विकेट घेतल्या.
SA vs WI : द. आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिका विजय, भारतासह ऑस्ट्रेलियाचाही मोठा विक्रम काढला मोडित….
वास्तविक, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला मागे टाकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. आफ्रिकेने 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चक्रात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 2 जिंकले, 3 गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे.





