Women’s T20 World Cup 2024 : द. आफ्रिकेची धडाकेबाज सुरुवात, वेस्ट इंडिजचा केला दारूण पराभव…

Women’s T20 World Cup 2024 (SA vs WI) : महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या तिसऱ्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाचा 10 गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांनी नाबाद अर्धशतके झळकावून आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. गोलंदाजीत 4 विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाचे योगदान देणारी फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबा (Nonkululeko Mlaba) ही सामन्याची मानकरी ठरली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी केली, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भक्कम गोलंदाजीसमोर संघाला 20 षटकांत 6 बाद 118 धावाच करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य होते आणि या संघाने 17.5 षटकात एकही विकेट न गमावता 119 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने 2 गुणांची कमाई केली.
A confident 10-wicket win to start South Africa’s Women’s #T20WorldCup 2024 👊#SAvWI #WhateverItTakes
📝: https://t.co/CRobr4IkPU pic.twitter.com/9xnHJgmtjx
— T20 World Cup (@T20WorldCup) October 4, 2024
दक्षिण अफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची कसोटी लागणार आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा पुढचा सामना 6 ऑक्टोबरला स्कॉटलंडशी होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य होते आणि प्रोटीज संघाने हे लक्ष्य अगदी सहज गाठले. तझमिन ब्रिट्स कर्णधार लॉरा वोल्वार्डसोबत सलामीला आली होती आणि दोघीही नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतल्या. या सामन्यात लॉराने 55 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 59 धावांची नाबाद खेळी केली तर तझमिनने 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी करून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
Women’s T20 World Cup 2024 : पाकिस्तानची विजयी सलामी, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा सहज केला पराभव…
खेळपट्टीवर वेस्ट इंडिजकडून जास्त धावांची अपेक्षा होती. पण फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबाने विडिंजच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजला 20 षटकात 6 गडी गमवून फक्त 118 धावांपर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिज संघाकडून स्टेफनी टेलरने 41 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 42 धावांची खेळी केली. कर्णधार हेली मॅथ्यूजने 10 धावांचे तर डिआंड्रा डॅटिनने 13 धावांचे योगदान दिले तर शमीन कॅम्पबेलने 17 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत म्लाबाने 4 षटकात 29 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मारिजाने कॅपने 4 षटकात 14 धावा देत दोन गडी बाद करण्यात यश मिळवलं.





