SA vs PAK 1st Test : सेंच्युरियन कसोटीत पाकचा लाजीरवाणा पराभव, विजयासह दक्षिण आफ्रिकेची थेट WTC च्या फायनलमध्ये धडक…

South Africa vs Pakistan 1st Test : सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव करत रोमहर्षक अशा विजयाची नोंद केली आहे. या विजयासह आफ्रिकेच्या संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2025) अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (ICC World Test Championship 2023-2025) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
⚪️🟢Match Result
We came, we saw, and WE CONQUERED.👏🇿🇦😃
A partnership for the history books! From near misses to heart-stopping moments, South Africa pulls off an incredible victory by 2 wickets. 🏏
This one will be remembered for some time to come!✨#WozaNawe #BePartOfIt… pic.twitter.com/jcqTwVWBYu
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 29, 2024
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकने कामरान गुलामच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 211 धावा केल्या होत्या. या काळात बाबर आझम आणि शान मसूद यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरले. यादरम्यान आफ्रिकेकडून गोलंदाजीत डॅन पॅटरसनने पाच आणि कॉर्बिन बॉशने चार विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात यजमानांनी एडन मार्कराम (89) आणि कॉर्बिन बॉश (81*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 301 धावा केल्या आणि 90 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 237 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य दिले. सौद शकीलने दुसऱ्या डावात आपली ताकद दाखवत 84 धावा केल्या तर बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही.
प्रत्युत्तरात विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात 99 धावांवर 8 विकेट अशी स्थिती झाली होती. मात्र कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांनी संघाला तारले. रबाडाने नाबाद 31 तर जॅनसेनने नाबाद 16 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना 2 गडी राखून जिंकला आणि यासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे.





