WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण; तब्बल १५ वर्षांनंतर फायनलमध्ये चारली धूळ

WTC Final 2025 South Africa Champion : इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) चे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव करत दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद मिळवले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला तब्बल १५ वर्षांनंतर आयसीसीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया हा क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो.
ऑस्ट्रलियाचा १५ वर्षांनंतर आयसीसी फानयलमध्ये पराभव –
ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत आयसीसी अंतर्गत १० मोठी विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये ६ वनडे विश्वचषक, २ चॅम्पियन्स ट्रॉफी, १ टी-२० विश्वचषक आणि १ टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपदाचा समावेश आहे. पण यावेळी नशीब ‘बॅगी ग्रीन’च्या बाजूने नव्हते. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आणि हे विजेतेपद जिंकले. कसोटी स्वरूपात दक्षिण आफ्रिकेचे हे पहिले मोठे विजेतेपद आहे.
Congratulations to @ProteasMenCSA on winning the @ICC World Test Championship! And a performance for the ages from @aramco Player of the Match Aiden Markram.
The @HomeOfCricket Lord’s was a fantastic venue, and the huge crowds every day once again showed the interest in Test… pic.twitter.com/arGKCZHAKx
— Jay Shah (@JayShah) June 14, 2025
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १४ वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश केला आहे. ज्यापैकी त्यांना केवळ ४ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- १९७५ वनडे विश्वचषक अंतिम सामना: वेस्टइंडीजविरुद्ध (लॉर्ड्स). वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले.
- १९९६ वनडे विश्वचषक अंतिम सामना: श्रीलंकेविरुद्ध (लाहौर). श्रीलंकेने ७ गडी राखून आणि २२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.
- २०१० टी-२० विश्वचषक अंतिम सामना: इंग्लंडविरुद्ध (ब्रिजटाउन, बार्बाडोस). इंग्लंडने ७ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
- २०२५ डब्ल्यूटीसी अंतिम सामना: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. ऑस्ट्रेलियाला चौथ्यांदा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा – WTC Final 2025 : विजयानंतर बावुमाच्या आनंदाला उरला नाही पारावार, ‘टेम्बा’ मिरवतानाचा VIDEO व्हायरल
पॅट कमिन्ससाठीही हा पराभव वेगळा अनुभव होता. कर्णधार झाल्यानंतर, त्याने २०२३ मध्ये भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी जेतेपद आणि त्यानंतर त्याच वर्षी एकदिवसीय विश्वचषक जेतेपद मिळवून दिले. आता या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया आपले संघटन बदलते की त्याच कोअर टीमसह पुढे जाते हे पाहणे मनोरंजक ठरेल.





