WTC Final 2025 : विजयानंतर बावुमाच्या आनंदाला उरला नाही पारावार, ‘टेम्बा’ मिरवतानाचा VIDEO व्हायरल

WTC Final 2025 Temba Bavuma Celebration Video : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच आयसीसीची गदा आपल्या नावावर केली. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या डावात २८२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे एडन मारक्रमच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी पूर्ण केले. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा खूप आनंदी दिसला.
टेम्बा बावुमाचा व्हिडिओ व्हायरल –
टेम्बा बावुमा याने दक्षिण आफ्रिका संघाच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याचा विक्रम प्रभावी राहिला आहे. अंतिम सामन्यात, जेव्हा संघ चौथ्या डावात २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, तेव्हा बावुमाने ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयसीसी कसोटी गदा जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचा विजयी उत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो गदेला बंदुकीप्रमाणे हातात धरून फिरवताना दिसत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील इतर खेळाडूसुद्धा खूप आनंदी दिसत होते. शिवाय, बावुमाने संघासोबत फोटो सेशन झाल्यानंतर आपल्या मुलासोबत हातात आयसीसी कसोटी गदा घेऊन मैदानाचा फेरफटका मारला.
Brigadier Temba Bavuma ……🤣🤣pic.twitter.com/YoKlQqI8EH#WtcFinal2025
— मास्टर_420 (@maaster_420) June 14, 2025
Just 10 Tests as captain and already a World Champion 🏆
Temba Bavuma has already done what others couldn’t in decades🤯
The aura is real.
LORD BAVUMA 👑#WTCFinal #SA
pic.twitter.com/4Kfao5iCte— Shahrooz Ahmad (@shahroozahmadd) June 14, 2025
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकल्यानतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “गेले काही दिवस आमच्यासाठी खूप खास होते. आम्हाला असं वाटलं जणू आम्ही दक्षिण आफ्रिकेत आपल्या घरी परतलो आहोत, कारण या सामन्यादरम्यान आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला. एक संघ म्हणून आमच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे. हा अनुभव पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील.”
हेही वाचा – WTC Final 2025 : आरसीबी-दक्षिण आफ्रिकेसह ‘या’ ८ संघांनी २०२५ मध्ये रचला इतिहास, संपवला ट्रॉफीचा दुष्काळ
यानंतर रबाडाचे कौतुक करताना बावुमा म्हणाला, “कागिसो रबाडा एक अप्रतिम खेळाडू आहे, पुढील काही वर्षांत तो आयसीसी हॉल ऑफ फेमचा भाग असेल. तो वादात सापडला होता, पण त्याने नेहमीप्रमाणे आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं. मारक्रमची कामगिरी देखील अविश्वसनीय होती, आकडेवारी महत्त्वाची आहे, पण आम्हाला माहीत होतं की तो काय करू शकतो. मला खात्री आहे की घरी लोक उत्सव साजरा करत असतील.”





