Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एंट्री केली असून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Rupali Chakankar) मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवरील आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. ट्रस्टमधील व्यवहार, निधीची देवाणघेवाण आणि पदाचा गैरवापर झाला का, याबाबत ईडी तपास करत आहे. (Rupali Chakankar) ७० कोटींच्या व्यवहारांचा तपास अशोक खरातवर खंडणी रॅकेट चालवून बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवल्याचा आरोप आहे. या आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास यंत्रणा शोध घेत आहेत. (Rupali Chakankar) याआधी CBI कडूनही चौकशी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची यापूर्वी सीबीआयकडून तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीनेही समन्स बजावल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Rupali Chakankar)