Rupali Chakankar : “संपूर्ण वस्त्रातील महिलेलाही बदनाम केलं”; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा मोठा निर्णय; बडे नेते अडकणार?
Rupali Chakankar : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Rupali Chakankar : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चाकणकर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (Rupali Chakankar)
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी अशोक खरात यांच्याशी आपला कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले. चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा जमीन व्यवहारात माझी भागीदारी नव्हती. (Rupali Chakankar)
तसेच मी कोणत्याही महिलेला त्यांच्याकडे घेऊन गेले नाही. तरीही गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोणताही पुरावा नसताना माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर अत्यंत अश्लाघ्य व खोटे आरोप करण्यात आले. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. (Rupali Chakankar)
AI चा वापर करून बदनामीचे षडयंत्र
रुपाली चाकणकर यांनी आरोप केला की, काही जणांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केले आणि सातत्याने बदनामी करण्याचा प्रयत्न केला. “संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीलाही समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता या सर्वांविरोधात कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणार आहे,” असे त्या म्हणाल्या. (Rupali Chakankar)
लढा स्त्रीत्वाचा…!
स्त्री सन्मानासाठी…!विकृत मनोवृत्तीच्या विरोधातील कायदेशीर लढाई…….!! pic.twitter.com/QWNnpJNyUY
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 10, 2026
दोन्ही पदांचे दिले होते राजीनामे
अशोक खरात प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा यासाठी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता, असे चाकणकर यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही आपल्याविरोधात सुरू असलेली चिखलफेक थांबली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Rupali Chakankar)
अनेकांना नोटिसा; कोर्टात हजर राहण्याचे आदेश
चाकणकर यांनी सांगितले की, बदनामी करणाऱ्या अनेक व्यक्तींना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आशा मिरगे यांना आतापर्यंत तीन नोटिसा पाठवण्यात आल्या, मात्र त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली असून २ जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. (Rupali Chakankar)
अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, रुपाली चाकणकर यांनी आता थेट न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Rupali Chakankar)





