Rupali Chakankar : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटला, रुपाली चाकणकरांच्या जागी कोणाची निवड?
Vaishali Nagwade : वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. अखेर या पदाची जबाबदारी पक्षाने पुणे जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक पकड असलेल्या वैशाली नागवडे यांच्यावर सोपवली आहे.
खामगाव (ता.दौंड) येथील वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. मुंबई येथे नागवडे यांना सदर निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.
यावेळी वैशाली नागवडे यांनी, “दादांचे विचार पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या पदाच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
कोण आहेत वैशाली नागवडे?
शेतकरी कुटुंबातील मुळच्या दौंड तालुक्यातील वैशाली नागवडे या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला संघटन उभारण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्या अजित पवार यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात.
महानंदा दूध महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्ष संघटनेत त्यांनी प्रभावी काम केल्यामुळे महिला आघाडीची धुरा त्यांच्याकडे देण्यात आल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मान्यतेने आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ. वैशाली नागवडे तसेच राष्ट्रवादी युवक… pic.twitter.com/EqkBg2LEwH
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) August 5, 2026
- १९९९ मध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या कामानिमित्त राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नागवडे कुटुंबीयांची परिचय झाला.
- वैशाली नलावडे यांची २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.
- २००५ मध्ये महानंदाच्या (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ) च्या संचालकपदी निवड झाली.
- २००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्यपदी निवड
- २००९ मध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
- २०१० मध्ये दुसऱ्यांदा महानंदाच्या संचालकपदी निवड झाली व २०१३ मध्ये राज्याच्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी IVRI – बरेली , उत्तर प्रदेश या संस्थेच्या डायरेक्टर झाल्या.
रुपाली चाकणकर यांना का द्यावा लागला?
रुपाली चाकणकर यांनी २७ मार्च २०२६ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. याशिवाय त्यांनी २० मार्च २०२६ रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा सोपवला होता.
हेही वाचा:
TVK: तामिळनाडूत महिलांसाठी ‘सुवर्ण’ घोषणा ; विजय सरकारचा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’






