विद्यार्थीदशेत संघाचे काम, आणीबाणीत भोगवा तुरुंगवास; नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री असा होता विजय रुपाणी यांचा जीवनप्रवास….!

Vijay Rupani passed away : १२ जून हा दिवस देशवासीयांसाठी मन्न सुन्न करणारा ठरला. अहमदाबाद येथे विमान दुर्घटेची दुर्देवी घटना घडली असून, विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्यांचा समावेश होता.
दैवबलवत्तर म्हणून एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. त्यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
विजय रुपाणी हे भाजपच्या विश्वासून नेत्यांमध्ये गणले जात होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी संघात समाील होण्याचा निर्णय घेतला. पुढे ते सक्रिय राजकारणात आले. दरम्यानच्या काळात नगरसेवक, आमदार, मंत्री आणि थेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. ५ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. ११ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पुढे पक्षकार्यात सक्रिय झाले.
विद्यार्थीदशेपासून संघपरिवाराशी नाते
विजय रुपाणी यांचा जन्म २ अॅाग्सट १९५६ रोजी म्यानमार येथील रंगून येथे झाला. त्यांचे वडिल व्यवसायासाठी म्यानमारला गेले होते. परंतु जेव्हा तेथील राजकीय परिस्थिती बिघडली. त्यानंतर ते १९६० मध्ये गुजरातमधील राजकोटला परतले. त्यांनी बीए, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेपासूनच ते संघ परिवाराशी जोडले गेले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून सामील झाले. 1971 मध्ये रुपाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ची राजकीय शाखा असलेल्या जनसंघात प्रवेश केला.इंदिरा सरकारने १९७६ साली देशात आणीबाणी लादली होती. त्यावेळी त्यांना ११ महिने भुज आणि भावनगर तुरुंगात कैद करण्यात आले होते.
अशी होती राजकीय कारकीर्द
१९८७ मध्ये विजय रुपाणी राजकोट महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
१९८८ ते १९८६ पर्यंत ते राजकोट महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
१९९५ मध्ये विजय रुपाणी पुन्हा एकदा राजकोट महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
१९९६ ते १९९७ पर्यंत राजकोट महानगरपालिकेचे महापौर देखील होते.
विविध पदांवर काम करण्याचा मान मिळाला.
रुपाणी हे गुजरातच्या राजकारणाचे अनुभवी खेळाडू मानले जात होते. गुजरातचे मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी असताना रुपाणी यांनी विविध पदे भूषविली होती. गुजरात वित्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. भाजपच्या गुजरात भाजपचे सरचिटणीस पदावरही ते होते. आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये परिवहन, पाणीपुरवठा, कामगार आणि रोजगार विभागाचे कॅबिनेट मंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला.
महाराष्ट्रात केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते.
२०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि मंत्री निर्माल सितारण केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री पदासाठी नाव देवेंद्र फडणवीस यांचे निश्चित केले होते.
हेही वाचा: जिद्दीने स्वप्न केलं पूर्ण, नियतीने हिरावून घेतलं; डोंबिवलीकर क्रू मेंबर रोशनीचा विमान दुर्घटनेतअंत





