RR vs LSG : पदार्पणातच मोठा धमाका करणारा वैभव सूर्यवंशी का रडला? कोचने केला खुलासा

RR vs LSG Vaibhav Suryavanshi Cried After Getting Out on Debut Video : आयपीएल २०२५ च्या ३६व्या सामन्यात लखनौने (LSG) राजस्थानचा (RR) दोन धावांनी पराभव केला. परंतु सवाई मानसिंग स्टेडियमवर सर्वात जास्त चर्चेत राहिला, तो राजस्थानचा १४ वर्षीय पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी. वैभवने सर्वात तरुण पदार्पणवीरसह पहिल्याच चेंडूवर षटकार मारत अनेक विक्रम केल. या सामन्यात तो २० चेंडूत ३४ धावांची खेळी साकारुन आऊट झाला. यानंतर तंबूत जाताना तो रडताना दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी याची खास कारणे सांगितली.
वैभवने पदार्पणातच रचला इतिहास –
आयपीएल २०२५ च्या ३६ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला या लीगमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासह, तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. डावखुरा फलंदाज वैभवने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामध्ये संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
जब भी इसका मज़ाक उड़ाने की भावना जोर से लगे,
बस याद करना, “तुम क्या कर रहे थे जब चौदह के थे?”@RajsthanRoyals@LucknowIPL #VaibhavSuryavanshi pic.twitter.com/QoGJUeZvaO— Gaurav Pratap (@gauravprat) April 19, 2025
वैभव सूर्यवंशीचा पदार्पणातच धमाका –
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभवने केवळ १४ वर्षे आणि २७ दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. इतकेच नव्हे, तर वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत षटकार मारून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. यासह तो आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकणारा आयपीएल इतिहासतील १० वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी रॉब क्विनी आणि केव्हॉन कूपर यांनी हा पराक्रम केला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – RR vs LSG : वैभव सूर्यवंशीचा पदार्पणातच धमाका! पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत रचला इतिहास
वैभव सूर्यवंशी का रडू लागला?
VAIBHAV SURYAVANSHI CRYING & GOT EMOTIONAL WHEN HE GOT OUT. 🥺💔 pic.twitter.com/SFAE7peGhB
— Tanuj (@ImTanujSingh) April 19, 2025
या ऐतिहासिक सुरुवातीनंतर वैभव का रडला? हे त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव पटना येथील झेनिथ क्रिकेट अकादमीमध्ये या खेळाचे बारकावे शिकले. टीव्ही 9 शी झालेल्या खास संभाषणात प्रशिक्षक मनीष यांनी वैभवच्या रडण्याची तीन कारणे सांगितली.
- ते म्हणाले, वैभवचे रडणे त्याच्या निरागसतेचे दर्शन घडवते की तो अजूनही लहान आहे आणि त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
- प्रशिक्षक मनीष यांनी दुसरे कारण सांगितले की, त्याच्या मनात मोठी खेळी खेळण्याची किंवा सामना जिंकण्याची काही मोठी योजना असावी, जी तो पूर्ण करू शकला नाही आणि अश्रूंद्वारे तो पश्चात्ताप व्यक्त करत होता.
- तिसरे कारण देखील खूप खास होते. प्रशिक्षक म्हणाले, “जर त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी, शतक किंवा अर्धशतक केले असते तर त्याची कामगिरी आणखी मोठी असती. या गोष्टी गमावल्याबद्दल त्याला नक्कीच पश्चात्ताप झाला असेल.”





