RR vs KKR : वरुण चक्रवर्तीचा केला कहर! १३ चेंडू निर्धाव टाकत घेतल्या ‘इतक्या’ विकेट्स, राजस्थानच्या फलंदाजांना फोडला घाम

RR vs KKR Varun Chakaravarthy impressive spell : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंची जादू दिसून आली नाही, पण गुवाहाटीच्या मैदानावर केकेआरच्या फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. केकेआरचे जादूगार वरुण चक्रवर्ती आणि मोईन अली होते, ज्यांनी राजस्थानविरुद्ध चार विकेट्स घेतल्या. दोघांनीही ८ षटकांत फक्त ४० धावा दिल्या. ज्यामध्ये वरुण चक्रवर्तीने राजस्थानच्या फलंदाजांना त्रास देत धावांवर अंकुश लावला.
वरुण चक्रवर्तीची कमाल –
जेव्हा वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करायला आला, तेव्हा रियान परागने त्याच्या तिसऱ्या चेंडूवर एक लांब षटकार मारला पण दोन चेंडूंनंतर त्याने या खेळाडूला बाद केले. यानंतर, चक्रवर्तीने एक अद्भुत चक्रव्यूह निर्माण केले आणि त्यामध्ये राजस्थानचे खेळाडू अडकत गेले. त्याने वानिंदू हसरंगाची विकेटही घेतली आणि त्याच्या चौथ्या षटकाच्या अखेरीस त्याने १३ डॉट बॉल टाकले. म्हणजे, या खेळाडूने २.१ षटकात एकही धाव दिली नाही, जी टी-२० क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
🔝 stuff from these two ✌️
How effective have the new @KKRiders spin twins been 😍💜
Updates ▶ https://t.co/lGpYvw87IR#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders pic.twitter.com/iFYcEK03NU
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
मोईन अलीने दाखवली आपली ताकद –
सुनील नरेन संघात सामील न झाल्यामुळे मोईन अलीला केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. नरेन आजारी असल्याने मोईन अलीला संधी मिळाली. नरेनच्या गैरहजेरीत असे वाटत होते की मोईन अली तो प्रभाव पाडू शकणार नाही, जो नरेन पाडतो. मात्र या खेळाडूने त्याच्या संघाला निराश केले नाही. मोईन अलीने ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या आणि २ बळी घेण्यात तो यशस्वी झाला. त्याने जैस्वालला २९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले आणि अलीने नितीश राणालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हेही वाचा – RR vs KKR : एक चूक अन् संजू सॅमसन क्लीन बोल्ड! केकेआरच्या युवा गोलंदाजासमोर टेकले गुडघे, VIDEO व्हायरल
राजस्थानची फलंदाजी ठरली अपयशी –
राजस्थान संघाने कोलकाताविरुद्ध फक्त १५१ धावा केल्या. त्याच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याच्याशिवाय जैस्वालने २९ धावा केल्या. रियान परागने २५ धावांचे योगदान दिले. कोलकाताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांच्याव्यतिरिक्त, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनाही दोन विकेट्स घेण्यात यश आले.





