RR vs GT: वैभव सूर्यवंशीचा विक्रमी धमाका! गुजरात टायटन्सची धुलाई करत झळकावले ऐतिहासिक शतक

RR vs GT Vaibhav Suryavanshi sets IPL record with fastest Century : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत इतिहास रचला आहे. तो आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणार युवा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने अनेक खेळाडूंना मागे टाकले. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले. या खेळी दरम्यान त्याने सात चौकार आणि ११ षटकार मारत अनेक विक्रम मोडले.
वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक शतक –
१४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी दाखवली आहे आणि त्याच्या वयापेक्षा जास्त काहीतरी केले आहे. टी-२० आणि चालू हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावल्यानंतर, त्याने आपले शतक देखील पूर्ण केले. त्याने ३५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला. त्याने ३७ चेंडूत सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणचा विक्रम मोडला. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले होते. त्याचा आयपीएलमधील हा फक्त तिसरा सामना आहे.
Vaibhav Suryavanshi writing his-story 🫡
The 14-year-old became the YOUNGEST player to score a HUNDRED in #TATAIPL 🩷
Updates ▶ https://t.co/HvqSuGgTlN#RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/XyatZYNGYS
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
त्याच वेळी, जर आपण आयपीएलमध्ये शतक ठोकणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजाबद्दल बोलायचे तर, वैभव सूर्यवंशीपूर्वी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. मनीष पांडेने १९ वर्षे २५३ दिवसांच्या वयात हे केले. पण आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या ( वय १४ वर्ष, ३२ दिवस) नावावरही आहे. एवढेच नाही तर वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. त्याच्या आधी मुरली विजयने २०१० मध्ये एका डावात ११ षटकार मारले होते.
हेही वाचा – RR vs LSG : वैभव सूर्यवंशीचा विक्रमी धमाका! गुजरात टायटन्सची धुलाई करत झळकावले ऐतिहासिक शतक
वैभव सूर्यवंशीचे विक्रमी अर्धशतक –
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात, त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार मारला होता. वैभव सूर्यवंशीने ६ षटकार मारून अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात त्याचा पहिला षटकार मारला. हा चेंडू ९० मीटर अंतरावर गेला. त्याने तिसऱ्या षटकात इशांत शर्माविरुद्ध ३ षटकार मारले. यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध दोन षटकार मारले. याशिवाय त्याने तीन चौकारही मारले.
हेही वाचा –Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानांमुळे खळबळ; दानिश कनेरियाचे चोख प्रत्युत्तर
वैभव सूर्यवंशीने लावली विक्रमांची रांग –
Youngest to score a T20 1⃣0⃣0⃣ ✅
Fastest TATA IPL hundred by an Indian ✅
Second-fastest hundred in TATA IPL ✅Vaibhav Suryavanshi, TAKE. A. BOW 🙇 ✨
Updates ▶ https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/sn4HjurqR6
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
- आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू
- आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू
- आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू
- टी-२० मधील सर्वात तरुण शतकवीर
- आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय (मुरली विजयनेही ११ षटकार मारले)
- यशस्वीसोबत १६६ धावांची भागीदारी, आयपीएलमध्ये आरआरसाठी सर्वात मोठी भागीदारी





