RR vs SRH Eliminator : राजस्थान रॉयल्सची ‘क्वालिफायर-२’ मध्ये दिमाखात एन्ट्री! वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने हैदराबादचं केलं पॅकअप
RR vs SRH Eliminator : या विजयानंतर राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना २९ मे रोजी क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे,

SRH vs RR Eliminator Rajasthan Royals won : आयपीएल २०२६ मधील अत्यंत थरारक अशा ‘एलिमिनेटर’ सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ४७ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. मुल्लानपूर स्टेडियमवर झालेल्या या नॉकआउट लढतीत वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने ‘क्वालिफायर-२’ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात राजस्थानने २४३ धावांचा डोंगर उभाला होता. प्रत्युत्तरात हैदरबादचा संघ १९६ धावांत गारद झाला
वैभवचे वादळ अन् राजस्थानचा २४३ धावांचा डोंगर!
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने १२५ धावांची तुफानी सलामी दिली. १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंत १२ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. जैस्वाल मात्र २९ चेंडूंत २९ धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल (५० धावा) आणि कर्णधार रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या.
Qualifier 2 is officially locked in! 🔒
One final hurdle to the summit clash 🎟️#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/y73BAkfWXC
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
जुरेल बाद झाल्यानंतर राजस्थानची फलंदाजी काहीशी घसरली आणि संघ २० षटकांत २४३ धावांपर्यंत पोहोचू शकला. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले, तर नितीश रेड्डी, ईशान मलिंगा आणि शिवांग कुमार यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
We are out of words 👏👏
9⃣7⃣(29) of absolute force from Vaibhav Sooryavanshi 🔥🔥
Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/gtt63Wwkx1
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
हैदराबादची फलंदाजी ढेपाळले; पॉवरप्लेमध्येच झाला गेम!
🎥 𝙏𝙝𝙚 𝙋𝙚𝙧𝙛𝙚𝙘𝙩 𝙀𝙣𝙙𝙞𝙣𝙜 🩷
Vaibhav Sooryavanshi takes the winning catch and caps off an unforgettable night ✨#TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/pR2OjgrrJv
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
प्रत्युत्तरात २४४ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्य (डक) धावांवर बाद झाला. यानंतर इशान किशनने ११ चेंडूंत ३३ आणि ट्रॅव्हिस हेडने ८ चेंडूंत १७ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते झटपट बाद झाले. पहिल्या ६ षटकांत (पॉवरप्ले) हैदराबादने ७१ धावा केल्या खऱ्या, पण त्यांनी आपले ४ महत्त्वाचे फलंदाज गमावले होते.
नितीश कुमार रेड्डी (३८ धावा) आणि सलिल अरोरा यांनी सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीश बाद होताच हैदराबादचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ १९६ धावांवर आटोपला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर नांद्रे बर्गर, सुशांत मिश्रा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ आणि यश राज पुंजा याने १ विकेट्स घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.





