कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी रोटरी सदैव अग्रेसर. – नियोजित प्रांतपाल रो.संतोष मराठे

पुणे – कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी रोटरी सदैव अग्रेसर असून रोटरीची सेवाभाव ही १२० वर्षांची उज्वल परंपरा आहे आणि हीच परंपरा पुणे येथील सर्व रोटरी क्लब समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन,नियोजित प्रांतपाल रो.संतोष मराठे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ व सेवा गौरव पुरस्काराच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रो.आरती प्रशांत देशपांडे तसेच सचिव रो. वृषाली गिरीश देशपांडे, माजी अध्यक्ष रो.उदय कुलकर्णी चार्टर्ड अध्यक्ष रो. प्रशांत देशपांडे तसेच रोटरीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यासाठी विविध उन्नतीचे उपक्रम राबवले जातात. सामाजिक प्रगतीसाठी रोटरीचे मोठे योगदान असल्याचे श्री. मराठे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात माहिती उपसंचालक पुणे ,डॉ.राजू पाटोदकर, एसआरईपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र कड, तसेच डॉ. मनीषा आणि डॉ. अभिजीत सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी रो.आरती प्रशांत देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल च्या अध्यक्षपदाची तर रो. वृषाली गिरीश देशपांडे यांनी सचिवपदाची सुत्र स्वीकारली. क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मेधा कुलकर्णी, डॉ. योगेश खंडाळकर, गिरीश देशपांडे, अजय चौधरी, श्रीनिवास जन्नू, अरुण शिंदे, शाम टेकाळे, शांतीकुमार मनसबदार व प्रशांत देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला. अध्यक्षा रो.आरती यांनी आगामी वर्षात राबविल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या समारंभात गतवर्षी रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे पदाधिकारी यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे क्लबमध्ये नव्याने सभासद झालेल्या अलोक झा, शुभम पाटील, योगेश वीर, नीलिमा यादव, माधुरी निटूरकर, डॉ, रविंद्र निटूरकर, वैशाली वेडे- पाटील, पुनम चौधरी, गणेश कुटे व अमोल चाफेकर या दहा नूतन सभासदांचे स्वागत करण्यात आले.
तरवडे क्लार्क्स इन हॉटेल, पुणे येथे आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.पुनम चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन रो.मेधा कुलकर्णी यांनी केले.





