रूपगंध: निर्णायक निवडणूक

– विश्वास सरदेशमुख
लोकसभा, विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा ङ्गडकणार यावर उत्सुकता ताणली आहे. शिवसेना अणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ङ्गाटाङ्गूट झाल्यानंतरची ही पहिलीच पालिका निवडणूक आहे. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज मुंबईत पुन्हा घुमणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली. या माध्यमातून मराठी मतांची विभागणी रोखण्याचा प्रयत्नदेखील होऊ शकतो.
मुंबईच्या राजकारणात गेल्या पाच ते सहा दशकांपासून दबदबा निर्माण करणार्या शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी ङ्गूट पडली. ठाण्याचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट काढून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपशी आघाडी केली आणि ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यादरम्यान अजित पवार यांनीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण उभारत ते भाजपच्या महायुतीत सामील झाले. तत्पूर्वी मविआनिमित्त एकत्र झालेले उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना लोकसभेत मोठ्या प्रमाणात यश मिळाले असले, तरी विधानसभेवर मात्र मविआला झेंडा ङ्गडकवता आला नाही.
याचे प्रमुख कारण होते मतविभागणी आणि भाजपशी सक्षम प्रचार यंत्रणा. मात्र आता त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिका निवडणुकीत एकगठ्ठा मतांचा कौल कसा मिळेल, यासाठी कामाला लागले आहेत. एकेकाळी मुंबईच्या राजकारणात एकाधिकार गाजविणारी शिवसेना सध्या विचित्र वळणावर येऊन ठेपली आहे. शिवसेनेचे कमी झालेले आमदार आणि राजकीय शक्ती पाहता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
1997 पासून 2022 पर्यंत शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर राज्य केले. मार्च 2022 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर आणि प्रशासक नेमल्यानंतर शिवसेनेला राजकीय हादरे बसले. पक्षप्रमुख वेळ देत नसल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी चूल मांडली. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. आतापर्यंत छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे या दिग्गजांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि स्वत:चे वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना पक्षाला तीन धक्के बसले.
परंतु एकनाथ शिंदे यांचा धक्का हा त्यापेक्षाही मोठा होता. चाळीसहून अधिक आमदार एकाचवेळी बाहेर पडणे हे राजकीयदृष्टया उद्धव ठाकरे यांना परवडणारे नव्हते. केवळ मुंबईतच नाही तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले. याचे नुकसान विधानसभेला सहन करावे लागले. आता महापालिकेत ही उणीव भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते नव्याने राजकीय गणितांची जुळवणी करताना दिसत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांपासून ते बुथ स्तरावरील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहे. एका माजी नगरसेवकाच्या मते, सत्तेत नसल्याने नगरसेवक, आमदारांना कायम जनतेशी संपर्कात ठेवताना अडचणी येतात. स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व असल्याशिवाय कार्यकर्त्यांची बांधणी अशक्य आहे. दादरचे एक माजी शाखाप्रमुख म्हणतात, आम्हाला नेतृत्वाची उणीव भासत आहे. दिशा नाही, रणनीती समजत नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनौधर्य खचल्याचे दिसून येते. एकेकाळी पक्षाचे बलस्थान असलेली युवा सेना देखील कमकुवत पडलेली दिसून येते.
आदित्य ठाकरे यांचंी लोकप्रियता असली, तरी कार्यकर्त्यांचा अपेक्षेप्रमाणे संपर्क राहत नसल्याचे चित्र आहे. एका तरुण कार्यकर्त्याच्या मते, निवडणुकीच्या काळातच त्यांच्याशी संपर्क होतो. मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे नेते प्रत्येक स्थानिक कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे आणखीच मजबूत होते. मराठी आणि हिंदूत्व हा शिवसेनेचा आधार. मात्र उद्धव ठाकरे यानंी गेल्या काही वर्षांत भूमिकेत बदल केल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
परळ येथील एका मतदाराच्या मते, आमच्यासारखे मराठी मध्यमवर्गीय मतदार हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे आहेत. पण आता ठाकरेसमवेत जावे की शिंदेसमवेत जावे, हे उमगत नाही. अर्थात, उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी असतानाही त्यांच्याबाबत अनेकांच्या मनात सकारात्मक भावना आहे. शिवसेनेचे नेते अनिल कोकीळ म्हणतात, करोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम जनता विसरू शकली नाही. पक्षात ङ्गूट पडली असली तर मुंबईत ठाकरे यांच्यासाठी आदर आणि भावना अजूनही तीव्र दिसून येते.
74 हजार कोटींचा अर्थसंकल्पाच्या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना 227 नगरसेवकांच्या सभागृहात एकसंध शिवसेनेकडे 97, भाजपकडे 83, काँग्रेसकडे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8, समाजवादी पक्षाकडे सहा, एमआयएमकडे दोन आणि मनसेकडे एक नगरसेवक होता. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात ङ्गूट पडल्यानंतर राजकीय चित्र बदलले आहे. शिवाय पालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक असल्याने नगरसेवकाची कामे अधिकारी पार पाडत आहेत. परिणामी नगरसेवकांचा जनतेशी असणारा संवाद कमी झाला आहे.
मनसेचे मुंबईचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे म्हणाले, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांची गरज भासते. परंतु प्रशासक असल्याने आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्यात हे जनतेला कळत नाही. यापैकी काही अधिकार्यांकडे गेले तरी ते ङ्गार महत्त्व देत नाहीत. गेल्या तीन वर्षांत स्थानिक अधिकार्यांनी मनमानीप्रमाणे कारभार केला असून अनावश्यक योजनांवर खर्च केल्याचा दावा केला. माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नगरसेवकाच्या गैरहजेरीत 90 हजार कोटींच्या ङ्गंडाचा वापर झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या वॉर्डाना अधिक प्राधान्य दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
एका राजकीय विश्लेषकाच्या मते, मुंबई पालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या भविष्यासाठी निर्णायक भूमिका बजावेल. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वाटचाल बीएमसी आणि ठाणे पालिकेच्या आधारावर पुढे गेली आणि बहरली. बीएमसीवर नियंत्रण असल्याने पक्ष आणि ठाकरे कुटुंबांचे वर्चस्व अबाधित राहिले. आता विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे बीएमसीत पराभूत होत असतील तर त्यांचे राजकीय अस्तित्व अडचणीत येऊ शकते. अन्य एका विश्लेषकाच्या मते, उद्धव ठाकरे विधानसभेला पराभूत झाले. मात्र त्यांचे वीस आमदारांपैकी दहा आमदार मुंबईतील होते. यावरून बीएमसीवर त्यांची अद्याप पकड असल्याचे सिद्ध होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत मनोमिलन झाल्यास मराठी मतदारांची ङ्गाटाङ्गूट रोखण्यात यश येईल. मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहील की नाही, हा देखील प्रश्न आहे. बीएमसी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कारण मुंबईत 40 पेक्षा अधिक नगरसेवक आपल्या गटात खेचण्यात शिंदे यांना यश आले. ठाकरे बीएमसी कायम ठेवण्यात यश मिळवत असतील, तर त्याचा शिंदे यांच्या राजकारणावर प्रतिकूल परिणाम पडू शकतो. अर्थात, भाजप आपल्या मागील कामगिरीच्या आधारावर आणि शिंदे यांच्या चाळीस नगरसेवकांच्या बळावर बीएमसी निवडणुकीत प्रमुख दावेदार आहे.





