Devendra Fadnavis : रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली महत्वाची माहिती
Devendra Fadnavis : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद महत्वाची माहिती दिली.

Devendra Fadnavis : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा झाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून, तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
या घटनेत लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित शुभम लोणकर हा मुख्य आरोपी असून, तो परदेशात असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या भावाला आधीच अटक झाली आहे आणि लवकरच शुभम लोणकरलाही अटक केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis
एनआयएने अनमोल बिष्णोईला अटक केली असून, त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. एनआयएची कोठडी संपल्यानंतर त्याचा ताबा मिळेल, अशी अपेक्षा आहे, असेही फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis

Devendra Fadnavis on rohit shetty
शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर यांनी सेलिब्रिटींना लक्ष्य करण्यात येत असल्याने त्यांच्यात निर्माण झालेल्या भीतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मी चित्रपट कलाकारांना आवाहन करतो की, त्यांनी घाबरू नये. मुंबईत गँगवॉर वाढू देणार नाही. सेलिब्रिटींना आवश्यक ती सुरक्षा पुरवली जाईल.”
शुभम लोणकरने यापूर्वी काँग्रेस आणि भाजप आमदारांना धमक्या दिल्या असून, परदेशातून फोन करून धमक्या देणे ही त्याची कार्यपद्धती आहे. मुंबई पोलिस सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास करत आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. Devendra Fadnavis
नेमकं काय घडलं होतं?
महिन्याभरापूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक राहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू येथील घरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लोरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. रोहित शेट्टीच्या घराबाहेर करण्यात आल्या गोळीबाराचा कट 4 महिन्यापूर्वीच शिजला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली होती.
शुभम लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट केली होती Devendra Fadnavis
‘आज मुंबईमध्ये (शेट्टी टॉवर) सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला, त्याची जबाबदारी शुभम लोंकर आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर हरमन संधू घेत आहे. आम्ही त्याला (रोहित शेट्टी) अनेकदा मेसेज केले की, आमच्या कामामध्ये येवू नकोस… पण त्याला कळलं नाही… आता त्याला हे कळंल नाही तर, पुढे त्याच्या घरावर नाही तर, बेडरुममध्ये गोळीबार करु… ही संपूर्ण बॉलिवूडला चेतावनी आहे…’’ अशी पोस्ट शुभम लोणकर याने केली होती.





