Allu Arjun Post : अखेर आज बहुचर्चित धुरंधर २ चित्रपट रिलीज झाला आहे. आदल्या दिवशी दाखवण्यात आलेल्या पेड प्री व्ह्यूज शोला चाहत्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने मोठी कमाई रिलीज आधीच केली आहे. सोशल मीडियावर धुरंधर २ मधील सीन्स व्हायरल होत आहेत. बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी पेड प्री व्ह्यूज शोमध्ये हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाविषयी लिहिले आहे. आता धुरंधर २ ची भुरळ पुष्पालाही पडली आहे. नुकताच साऊथ इंडस्ट्रीचा आयकॅास्टार स्टार अल्लू अर्जुनने धुरंधर २ पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर या कलाकृतीविषयी त्याने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत अभिनेता रणवीर सिंह, दिग्दर्शक आदित्य धर आणि आर. माधवन यांच्यासह सर्व कलाकारांचे आणि चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. हेही वाचा : Rajgad News : राजगड परिसरात मुसळधार पाऊस! उन्हाच्या तडाख्यात निसर्गाचा कोप; बळीराजाला फटका माझ्या भावासारखा रणवीर सिंह सारखा एक अत्यंत हुशार आणि अष्टपैलू अभिनेता आपल्या देशात असल्याचा मला खूप अभिमान वाटतो, असे कौतुकाचे शब्द अल्लूने रणवीर सिंहसाठी लिहिले आहेत. यासोबतच चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्याविषयी देखील त्याने भावना व्यक्त करत आदित्य धर याने तर कमालच केली आहे. सिक्सरच मारला आहे. त्यांच्यासारखे उत्कृष्ट चित्रपट निर्माते आपल्या देशात असल्याचा खूप आनंद होतो. चित्रपटाने अक्षरशः गाजवून सोडले आहे. एक भारतीय कथा… पण आंतरराष्ट्रीय दर्जाची शैली! अशा शब्दांत चित्रपटाविषयी अल्लूने मत व्यक्त केले आहे. शेवटी अल्लूने जय हिंद असेही म्हटले आहे. Just Watched #Dhurandhar2⁰Patriotism with swag 🇮🇳 A film that will make every patriot proud 🇮🇳⁰Many clap-trapping moments 👏🏽 BLAST! 💥 Congratulations to the entire team.⁰Fine performances by @ActorMadhavan garu & all actors . Technical brilliance . So proud to have a… — Allu Arjun (@alluarjun) March 18, 2026 नेमकं काय म्हणाला अल्लू अर्जून? आत्ताच धुरंधर २ पाहिला. देशभक्ती, तीही अगदी हटके शैलीत. असा चित्रपट जो प्रत्येक देशभक्ताला अभिमान वाटायला लावेल. टाळ्यांचा कडकडाट करायला लावणारे अनेक प्रसंग. धमाकाच! संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. आर माधवन आणि इतर सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय. तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट अप्रतिम आहे. माझ्या भावासारखा, रणवीर सिंह सारखा एक अत्यंत हुशार आणि अष्टपैलू अभिनेता आपल्या देशात असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. RVS ने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर यांनी तर कमालच केली आहे (सिक्सरच मारला आहे). त्यांच्यासारखे उत्कृष्ट चित्रपट निर्माते आपल्या देशात असल्याचा खूप आनंद होतो. चित्रपटाने अक्षरशः गाजवून सोडले आहे. एक भारतीय कथा… पण आंतरराष्ट्रीय दर्जाची शैली! जय हिंद हेही वाचा : Otur Accident : पहाटेचा प्रवास ठरला शेवटचा! स्विफ्ट-पिकअपची जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू