Gudipadwa 2026: नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्र पठण
Gudipadwa 2026: नागपूरमधील शोभा यात्रेनिमित्त सामूहिक राम रक्षा पठण करण्यात आले.

Gudipadwa 2026: नागपूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम त्यांचा मतदारसंघात असलेल्या शोभा यात्रेत आठ रस्ता चौकातून सहभागी झाले असून नागपूरमधील शोभा यात्रेनिमित्त सामूहिक राम रक्षा पठण करण्यात आले. या शोभायात्रेमध्ये नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. Gudipadwa 2026
यावेळी माध्यामांसोबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दरवर्षी प्रमाणे आपण आपलं नववर्ष साजरे करण्यासाठी आलो आहोत. हा आपल्यासाठी मोठा उत्सव आहे. Gudipadwa 2026

Gudi Padwa 2026
नवसंकल्प घेऊन आता पुढे जाऊ. पारंपरिक वेषात आपण येतात. एकप्रकारे नगपूरचा भाग भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही गुढी भारताची गुढी आहे, मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी अशा शुभेच्छा देतो.” Gudipadwa 2026
तसेच नवीन वर्षाचा संकल्प महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊन प्रत्येकाच्या जीवनात सकारत्मकता घडवायची असल्याचेही यावेळी फडणवसांनी सांगितले.
🕢 7.44am | 19-3-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/8dzqhYskPA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2026
याशिवाय ट्वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसांनी, ‘चला, मराठी नववर्षाच्या शुभारंभाचा सण साजरा करूया, सकारात्मक व परिवर्तनशील मार्गाने महाराष्ट्राच्या उन्नतीची गुढी उभारूया!
सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!.’ या आकांक्षेसह मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या शोभायात्रेत विशेष अतिथी म्हणून सहभागी आहे. यावेळी ढोल ताशा पथक, लेझीमी पथक, वारकरी, भगवा ध्वजधारी या सह अनेक चित्ररथ आणि पथक सादरीकरण करत आहे.
हेही वाचा:





