Rohit Shetty Firing Case : चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या (Rohit Shetty Firing Case) प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे. मुंबई गुन्हे शाखेने विशेष कृती दलाच्या मदतीने गोलू पंडित या आरोपीला ताब्यात घेतले. पंडितला मुंबईत (Rohit Shetty Firing Case) आणले जात असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी मुंबईत पोहोचल्यानंतर या प्रकरणाबाबतची पुढील सविस्तर माहिती दिली जाईल. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या शुभम लोणकर याने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. Rohit Shetty Firing Case लोणकर हा राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात, तसेच वांद्रे येथील बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही फरार आरोपी आहे. शेट्टी (Rohit Shetty Firing Case) यांच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मकोका) कठोर कलम लागू केले आहे.