Rohit Sharma : ‘ऑस्ट्रेलियात खेळणं किती कठीण, इंग्लंडलाच विचारा!’, रोहितने स्टोक्सच्या संघाची उडवली खिल्ली, पाहा VIDEO

Rohit Sharma statement on England Team : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आपल्या फटकेबाजीसोबतच हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. रविवारी, २१ डिसेंबर रोजी गुरुग्राम येथील एका कार्यक्रमात रोहितने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील अनेक पैलू उलगडले. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांच्या आव्हानाबद्दल बोलताना सध्या अॅशेस मालिकेत पराभूत झालेल्या इंग्लंड संघाची चांगलीच फिरकी घेतली.
इंग्लंडच्या पराभवावर रोहितचा टोला –
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका सुरू आहे. ‘बॅझबॉल’ क्रिकेटचा गाजावाजा करणाऱ्या इंग्लंड संघाने पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे त्यांनी मालिका गमावली आहे. याच परिस्थितीचा संदर्भ देत रोहित म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळणे हे सर्वात कठीण आव्हान आहे, हवे तर तुम्ही इंग्लंडला विचारू शकता.” रोहितचे हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्या या मिश्किल शैलीचे कौतुक केले आहे.
Rohit Sharma said : “Playing in Australia is the most difficult you can ask England about it.” 😭😂🔥
bRO just owned England and @TheBarmyArmy 🤣😆🙏 pic.twitter.com/qvXQWMQNe3
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) December 21, 2025
२०२३ वर्ल्ड कपच्या पराभवानंतर निवृत्तीचा विचार –
या कार्यक्रमात रोहितने एक खळबळजनक खुलासाही केला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाने तो इतका खचला होता की, त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे मन बनवले होते. मात्र, त्यानंतर चाहत्यांचे प्रेम आणि संघसहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तो पुन्हा मैदानात परतला आणि भारताला २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला.
हेही वाचा – Axar Patel : दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले? ‘हा’ खेळाडू असणार नवा कर्णधार
ऑस्ट्रेलियातील रोहितची कामगिरी: वनडेत राजा, कसोटीत अपयश
रोहितने ऑस्ट्रेलियात आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम केले आहेत, पण त्याचे स्वरूप फॉरमॅटनुसार वेगळे राहिले आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० हून अधिक धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. तिथे त्याने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
हेही वाचा – Yuzvendra Chahal : युझी चहलने आरजे महावशला नव्हे, तर ‘या’ खास व्यक्तीला गिफ्ट केली नवी कोरी BMW कार
२०१३ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितला ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांत फारशी छाप पाडता आली नाही. त्याने तिथे १० कसोटी सामन्यांतील १९ डावांत केवळ ४३९ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या कारकीर्दीतील शेवटच्या ऑस्ट्रेलियन कसोटी दौऱ्यावर ५ डावांत त्याला केवळ ३१ धावा करता आल्या. रोहितचे हे स्पष्टवक्तेपण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून, त्याने इंग्लंडच्या पराभवावर मारलेला टोला क्रिकेट वर्तुळात चर्चेत आहे.





