Yuzvendra Chahal : युझी चहलने आरजे महावशला नव्हे, तर ‘या’ खास व्यक्तीला गिफ्ट केली नवी कोरी BMW कार

“आई-वडील हेच खरे वैभव” – युझीची भावूक पोस्ट
कार घरी आणतानाचे फोटो शेअर करताना चहलने एक अतिशय भावनिक संदेश लिहिला आहे. त्याने आपल्या पालकांच्या त्यागाचे आणि निरंतर पाठिंब्याचे आभार मानले आहेत. त्याने ‘एक्स’वर लिहिले की, “ज्या दोन व्यक्तींनी माझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवले, त्यांच्यासोबत ही नवीन कार घरी आणली आहे. माझ्या पालकांना या यशाचा आनंद घेताना पाहणे, हेच माझ्यासाठी खरे ‘लक्झरी’ (वैभव) आहे.”
Brought my new car home with the two people who made every dream possible. Watching my parents witness and relish this milestone is the real luxury. ❤️🫂🧿 pic.twitter.com/UL1ZOvmH97
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 22, 2025
दीड वर्षांपासून टीम इंडियाबाहेर –
युझवेंद्र चहल गेल्या दीड वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी २०२३ मध्ये तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता. टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेत्या भारतीय संघात तो सदस्य होता, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सध्या संघात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे फिरकीपटू सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने चहलसाठी पुनरागमन करणे कठीण झाले आहे.
हेही वाचा – Mitchell Starc : DRSसाठी आयसीसीने पैसे द्यावेत! Snickometer वादानंतर मिचेल स्टार्कची मागणी
आयपीएलमध्ये मात्र ‘स्पिन किंग’ची जादू कायम –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नसली तरी, आयपीएलमध्ये चहलची जादू आजही कायम आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळताना दिसला. या मोसमात त्याने १४ सामन्यांत १६ विकेट्स घेत आपली छाप पाडली. यात त्याने दोनदा डावात ४ विकेट्स घेण्याची किमया साधली. ८० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ९६ विकेट्स आणि ७२ वनडे सामन्यांत १२१ विकेट्स नावावर असलेला हा अनुभवी गोलंदाज आजही दबावाच्या परिस्थितीत प्रभावी कामगिरी करण्यास सक्षम असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.





