Australian Women Cricketers : इंदौरात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढणाऱ्या आरोपीला सहा तासात अटक!

कशी घडली घटना?
ही घटना गुरुवारी सकाळी अंदाजे ११ वाजता घडली. ऑस्ट्रेलियाई संघाच्या दोन खेळाडू हॉटेल रॅडिसन ब्लू येथून खजराना रोडवरील एका कॅफेमध्ये पायी जात होत्या. याचवेळी एका तरुणाने पांढरा शर्ट आणि काळी टोपी घालून दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. काही वेळ पाठलाग केल्यानंतर त्याने एका खेलाडूसोबत अश्लील कृत्य केले आणि तिथून पळ काढला.
घाबरलेल्या खेळाडूंनी तात्काळ त्यांचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमंस यांना संदेश पाठवून फोन केला. सिमंस म्हणाले, “जेव्हा मी त्यांचा संदेश वाचला, तेव्हाच एका खेळाडूचा फोन आला. ती रडत होती आणि म्हणाली, ‘कोणीतरी आम्हाला छेडले.’ मी तात्काळ कार पाठवून दोघींना हॉटेलमध्ये परत बोलावले.”
हेही वाचा – Team India : अखेर ठरलं ! टीम इंडिया सेमी फायनलमध्ये ‘या’ संघाशी भिडणार
सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपी गजाआड –
घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक नोंदवला, ज्यामुळे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला. एमआयजी पोलीस ठाण्यात डॅनी सिमंस यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विजय नगर, खजराना, परदेशीपुरा आणि कनाडिया पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख खजराना येथील रहिवासी अकील अशी झाली. शुक्रवारी सायंकाळी त्याला आझाद नगर येथून अटक करण्यात आली.
Big News 🚨
Aqueel Khan, 28, arrested by Indore Police for allegedly stalking and molesting two Australian women’s cricket team members on Oct 23, 2025.
Australia team currently is in India playing women’s ODI World Cup 2025.
Video 📷#INDvsAUS #RohitSharma #ViratKohli pic.twitter.com/75nlFcoiQJ
— Globally Pop (@GloballyPop) October 25, 2025
सुरक्षेतील चूक; पोलीस आयुक्तांचा संताप –
पोलिसांनी आरोपीला चांगलाच चोप दिल्याचे समजते. अतिरिक्त उपायुक्त (गुन्हे शाखा) राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आता सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच्या संपूर्ण मार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संतोष सिंग यांनी सुरक्षा यंत्रणांना फटकारत गुप्तचर विभागाकडून खुलासा मागितला आहे. महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आता अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा – IND vs AUS : ‘हा आमचा शेवटचा दौरा…’, विजयानंतर विराट-रोहितचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO
एमपीसीए अध्यक्षांनी व्यक्त केले दुख –
मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले. ते म्हणाले, “इंदौरात ऑस्ट्रेलियाई महिला खेळाडूंशी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. आमचे शहर नेहमीच पाहुण्यांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी ओळखले जाते. एका व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनाने या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.”





