MI vs LSG : ‘क्या रे हीरो, अभी आ रहा है, घर का टीम है क्या?’, रोहितने घेतली शार्दुलची शाळा, पाहा VIDEO

MI vs LSG Rohit Sharma Mocks Shardul Thakur Video Viral : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने एलएसजीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची चांगलीच शाळा घेतली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही संघांमधील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, मुंबई इंडियन्सचा दिग्गज आणि माजी कर्णधार रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रात भाग घेतला आणि या दरम्यान, त्याने लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सरावासाठी उशिरा आल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली.
रोहित-शार्दुलचा व्हिडीओ व्हायरल –
When बोरीवली meets पालघर 😂💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/pQQMFplNHl
— Mumbai Indians (@mipaltan) April 25, 2025
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित एलएसजीचा वेगवान गोलंदाजाला म्हणताना दिसत आहे की, “क्या रे हीरो, अभी आ रहा है, घर का टीम है क्या?” हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा – CSK vs SRH : सीएसकेच्या पराभवानंतर अभिनेत्री श्रुती हसनला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल
गेल्या वेळी लखनौने मुंबईवर केली होती मात –
गेल्या वेळी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एकाना स्टेडियमवर सामना झाला होता, तेव्हा लखनौने १२ धावांनी विजय मिळवला होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स एलएसजीविरुद्ध घरच्या चाहत्यांसमोर दमदार कामगिरी करण्याचा आणि ऋषभ पंत अँड कंपनीविरुद्ध मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – Shubman Gill : ‘मी तीन वर्षांपासून…’, शुबमन गिलचा लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, पाहा VIDEO
मागील दोन सामन्यात हिटमॅनला गवसला सूर –
रोहित शर्माची आयपीएल २०२५ मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. तो पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. सलग पाच सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, रोहित आता त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. रोहित सीएसके विरुद्ध ४५ चेंडूत ७६ धावा करत नाबाद राहिला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात त्याने ४६ चेंडूत ७० धावा करत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला.





