Rohit Sharma : ‘मला वानखेडेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, पण आज…’, विजयानंतर हिटमॅन झाला भावुक

Rohit Sharma express his feelings about Wankhede Stadium : आयपीएल २०२५ च्या ३८ व्या सामन्यात, रोहित शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ९ विकेट्सने पराभव केला. या खेळीसह, रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नईविरुद्ध रोहित शर्माने ७६ धावांची नाबाद खेळी केली. यासह मुंबईने आपल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयानंतर बोलताना हिटमॅनने वानखेडे स्टेडियमबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने अलीकडेच जाहीर केले की त्यांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहितचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. रोहित व्यतिरिक्त, स्टँडना भारताचे महान फलंदाज अजित वाडेकर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले जाईल. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा याला एक मोठा सन्मान मानतो. यानंतर तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही.
एकेकाळी मला वानखेडेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता -हिटमॅन
Rohit Sharma said, “In my childhood we were not allowed to enter Wankhede, now a stand is going to be built in my name, this will be a very emotional moment for me, I don’t know how I will react”. 🥹#CSKvsMI #RohitSharmapic.twitter.com/1oN8KUoX4e
— Indian Cricket Team (@incricketteam) April 20, 2025
या सामन्यानंतर, रोहित शर्माने मुंबईतील वानखेडे स्टेडियमबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, एक काळ असा होता, जेव्हा मला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नव्हता. स्टेडियमच्या बाहेर उभे राहून आत डोकावण्याचीही परवानगी नव्हती. आज, जेव्हा मी त्याच मैदानावर खेळत आहे आणि तिथे माझ्या नावावर एक स्टँड आहे, तेव्हा मला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. हा एक मोठा सन्मान आहे.
हेही वाचा – BCCI Central Contract : बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! इशान-अय्यरचे धमाकेदार पुनरागमन
मी लहानपणापासून माझे बहुतेक क्रिकेट इथेच खेळलोय – रोहित शर्मा
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, मी माझे बहुतेक क्रिकेट इथेच खेळलो आहे. माझ्या लहानपणी मला हे मैदान फक्त दुरूनच दिसत असे आणि आज जेव्हा तिथे खेळताना मी शॉट मारला आणि चेंडू ‘रोहित शर्मा स्टँड’ वर पोहोचला, तेव्हा तो क्षण खूप खास होता. त्यावेळी मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सच्या सलग तीन विजयांवर आपली प्रतिक्रिया दिली.





