BCCI Central Contract : बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! इशान-अय्यरचे धमाकेदार पुनरागमन

BCCI Central Contract Announce : बीसीसीआयने २०२४-२५ या वर्षासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. त्यात एकूण ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हा करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. यामध्ये, सर्व ३४ खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यामध्ये ए+, ए, बी आणि सी श्रेणींचा समावेश आहे. भारताने मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात असलेल्या खेळाडूंनाही केंद्रीय करारात स्थान मिळाले आहे.
रोहित-कोहलीचा ए+ श्रेणीत समावेश –
बीसीसीआयने फक्त चार खेळाडूंना ए+ श्रेणीत स्थान दिले आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. रोहित, कोहली आणि जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळतात. ए+ श्रेणीत खेळणाऱ्या खेळाडूंना ७ कोटी रुपये मिळतात.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
— BCCI (@BCCI) April 21, 2025
इशान किशन आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन –
गेल्या वेळी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्याच वेळी, अय्यरने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याच कारणास्तव दोघेही परतले आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रविचंद्रन अश्विनला यावेळी केंद्रीय करारात समाविष्ट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा – PBKS vs RCB : आरसीबीच्या विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृतीवर संतापला श्रेयस, पाहा VIDEO
ए श्रेणीत ६ खेळाडूंचा समावेश –
ए श्रेणीत मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. बीसीसीआयने या फक्त ६ खेळाडूंना ए श्रेणीत समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने बी श्रेणीत पाच खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. बी श्रेणीतील खेळणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी रुपये मिळतात.
हेही वाचा – MI vs CSK : मुंबईने घेतला पहिल्या पराभवाचा बदला! रोहित-सूर्यासमोर चेन्नईने पत्करली शरणागती
सी श्रेणीत स्थान मिळालेले खेळाडू:
रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश. या श्रेणीतील खेळाडू १ कोटी मानधन मिळते.





