RR vs MI : रोहितच्या रिव्ह्यूवरुन पेटला नवा वाद! संतप्त चाहत्यांकडून पंचांवर प्रश्न उपस्थित, पाहा VIDEO

Rohit Sharma’s DRS Controversy Sparks Social Media Storm in RR vs MI Match : गुरुवारी (०१ मे) जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला आणि पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सला नेहमी त्यांच्या दमदार कामगिरीसाठी चांहत्यांकडून भरपूर मिळतो, परंतु या सामन्यात असे काही घडले ज्यानंतर मुंबई संघ सोशल मीडियावर चाहत्यांचा लक्ष्य बनला आहे. फक्त मुंबई इंडियन्सच नव्हे तर रोहित शर्मा, अंपायर आणि आयपीएल सर्वच ट्रोल होत आहेत. याचे कारण काय होतं? जाणून घेऊया.
या सामन्यात रोहित शर्माने डीआरएस घेण्याच्या वेळेवरून वाद निर्माण झाला. सामन्यादरम्यान पंचांनी रोहितला बाद घोषित केले. यानंतर रोहितने डीआरएस घेतला, ज्यामुळे पंचाना आपला निर्णय मागे घेत नाबाद घोषित करावं लागलं. मात्र, आता रोहित शर्माने घेतलेल्या डीआरएसवरुन प्रश्न उपस्थित होतं आहेत. कारण चाहत्यांचं म्हणनं आहे की, रोहितने १५ सेकंद झाल्यानंतर रोहित शर्माने डीआरएस घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर पंचांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहितने रिव्ह्यू घेण्यास केला उशीर –
Rohit Sharma took the DRS after time ran out. How can the Umpire allow him to use DRS after time expired? Will they allow this if it was a RR batter?
Umpiring Indians 🤡 pic.twitter.com/cBFkiWiHzx
— 𝐁𝐑𝐔𝐓𝐔 (@Brutu24) May 1, 2025
खरं तर, दुसऱ्याच षटकात, फजल फारुकीच्या चेंडूवर रोहित शर्माविरुद्ध पायचितची अपील करण्यात आले, ज्यावर पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यावेळी रोहित फक्त सात धावांवर फलंदाजी करत होता. पंचांच्या निर्णयानंतर, रोहितने रिव्ह्यू घेण्यासाठी बराच वेळ घेतला. तो रिव्ह्यू घेणार नाही असे वाटत होते, पण १५ सेकंदांचा टायमर शून्यावर पोहोचताच त्याने डीआरएससाठी इशारा दिला. रिव्ह्यूमध्ये रोहित नाबाद आढळला. ज्यानंतर चाहत्यांनी पंचांच्या पंचगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चाहत्याचं मत आहे की वेळ संपल्यानंतर कसा कोणी डीआरएस घेऊ शकतो. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. कारण नियमांनुसार १५ सेकंदांच्या आत डीआरएस घ्यावा लागतो.
हेही वाचा – Sreesanth Ban : श्रीसंतवर तीन वर्षांची बंदी: संजू सॅमसन प्रकरण भोवलं! काय आहे कारण? जाणून घ्या
सोशल मीडियावर उठलं वादळ –
Paisa hai toh badi badi badi badi badi baate🤡#RRvsMI #IPL2025 #Fixing #Umpire pic.twitter.com/N9jnUEWFKx
— 𝗗𝗲𝘀𝗶 𝗗𝘂𝗻𝗶𝘆𝗮 (@desiduniya21) May 1, 2025
Controversy over Rohit Sharma’s dismissal and DRS taken after the timer was over?#RRvsMI #RohitSharma𓃵 #Mi #umpire #RRvMI #MIvRR #MIvsRR #IPL2025 #ipl pic.twitter.com/hdNY2NbK1s
— Fourth Umpire (@UmpireFourth) May 2, 2025
मुंबईने हा सामना अगदी सहज जिंकला. पण यानंतर, या निर्णयाविरुद्ध चाहत्यांचा रोष सोशल मीडियावर उफाळून आला. अनेकांनी पंचांवर मुंबईला मदत केल्याचा आरोपही केला आहे. तथापि, दरम्यान काही लोक रोहितच्या बचावातही आले. काही युजर्सने म्हटले की रोहितने शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला होता, परंतु त्याने तो १५ सेकंदांच्या वेळेच्या आत घेतला होता. हा वादाच बराच वेळ एक्सवर ट्रेंडिंग होता.





