Sreesanth Ban : श्रीसंतवर तीन वर्षांची बंदी: संजू सॅमसन प्रकरण भोवलं! काय आहे कारण? जाणून घ्या

Sreesanth Banned for Three Years : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे संजू सॅमसन या हंगामातील बहुतेक सामन्यांपासून दूर राहिला. त्याच्या जागी, तरुण रियान पराग संघाची धुरा सांभाळताना दिसला. दरम्यान, केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय गोलंदाज एस. श्रीसंतने संजू सॅमसनच्या प्रकरणात केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर मोठा निर्णय दिला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतवर पुढील तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
संजू सॅमसन प्रकरणी श्रीसंतवर तीन वर्षांची बंदी –
खरंतर, काही काळापूर्वी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने संजू सॅमसनबाबत केरळ क्रिकेट बोर्डाविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. त्याबाबत, केरळ क्रिकेट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यावर पुढील तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. श्रीसंत केरळ क्रिकेट लीगमधील कोल्लम एरीज संघाचा सह-मालक आहे.
Thiruvananthapuram: The Kerala Cricket Association (KCA) has suspended former Indian cricketer S. Sreesanth for a period of three years, citing false and defamatory remarks made against the association amid the controversy surrounding Sanju Samson’s omission from India’s squad…
— ANI (@ANI) May 2, 2025
काय होतं प्रकरण?
एका मल्याळम टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान एस श्रीसंतने सॅमसनला पाठिंबा दर्शवताना, केसीएवर विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघातून सॅमसनला वगळल्याचा आरोप केला होता. त्यामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता प्रभावित झाली होती. केसीएने त्याच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती, ज्याबाबत त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – RR vs MI : मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय! राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
संजू सॅमसनचे केले होते समसर्थन –
केरळ क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफी संघातून संजू सॅमसनला वगळले होते. यावेळी, श्रीसंतने संजू सॅमसनला पाठिंबा देताना केरळ क्रिकेट असोसिएशनवर आरोप केला होता की विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातील स्थान गमवावे लागले.





