Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय

Rohit Sharma Complete 20,000 Runs in International Cricket News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने एक मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो ही कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आता या क्लबमध्ये रोहित शर्माची एन्ट्री झाली आहे. यासह त्याने यशस्वी जैस्वालसह पहिल्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी रचली आहे. विशाखापट्टणम येथे त्याने 27 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पार केला.
रोहित शर्माचा प्रवास अनेक कामगिरीने भरलेला –
“20,000 international runs for Rohit Sharma — a remarkable milestone.”#RohitSharma#INDvsSA pic.twitter.com/UvvcEZwkhB
— Fusion (@Ritikfusion12) December 6, 2025
2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित त्याच्या कारकिर्दीत 500हून अधिक सामने खेळून ही कामगिरी केली आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय या तिन्ही स्वरूपात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 50हून अधिक शतके आणि 110 हून अधिक अर्धशतके झळकावली आहेत. रोहितने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही वर्चस्व गाजवत आहे. त्याने या स्वरूपात 11,400 हून अधिक धावा केल्या आहेत, जे त्याच्या सातत्य आणि दर्जाचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा – IND vs SA : ‘गो बॅक!’ रोहितने DRS वरुन कुलदीपची घेतली फिरकी, पाहा मजेशीर VIDEO
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा करणारे भारतीय खेळाडू:
- सचिन तेंडुलकर (34,357 धावा)
- विराट कोहली (27,910 धावा)
- राहुल द्रविड (24,208 धावा)
- रोहित शर्मा (20,000+ धावा)
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
- कसोटी (67 सामने): 4301 धावा (12 शतके, 18 अर्धशतके)
- एकदिवसीय (278 सामने): 11,468 धावा (33 शतके, 60 अर्धशतके)
- टी-20 आंतरराष्ट्रीय (159 सामने): 4231 धावा
हेही वाचा – Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा गाबा कसोटीत ‘डबल’ धमाका: 12 वर्षांनंतर ॲशेसमध्ये केला मोठा पराक्रम
मालिकेतील फॉर्म आणि ऐतिहासिक खेळी –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने उत्कृष्ट फॉर्ममध्ये पाहिले. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 57 धावांची खेळी करत 20,000 धावा पूर्ण केल्या. रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 14 धावांवर बाद झाला, ज्यामुळे ही कामगिरी तिसऱ्या सामन्यापर्यंत पुढे गेली.





