पिंपरी | धनगर समाजाचा सांगवी फाटा येथे रास्ता रोको

पिंपळे गुरव,(वार्ताहर) – आरक्षण अंमलबजावणी व्हावी, यासाठी मागील14 दिवसांपासून समाजाचे 6 बांधव पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यानां पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने तात्काळ कार्यवाही करावी यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने सांगवी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.
सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या आदेशानुसार सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने तहसीलदार यांना तर अहिल्यादेवी सेवा संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
संपूर्ण राज्यात आज रस्ता रोको आंदोलन करण्याचे समन्वय समितीने ठरवले होते. त्यानंतर पंढरपूर येथे आज राज्यव्यापी निर्णायक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीही शहरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.





