Riyan Parag statement : ‘संजू भाईंना रिप्लेस करणं अशक्य…!’ सॅमसनबद्दल बोलताना रियान भावूक; ‘रो-को’चा उल्लेख करत जिंकली मनं
Riyan Parag statement : रियानला 'संजू सॅमसनची जागा कशी भरून काढणार?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रियानने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

Riyan Parag statement on Sanju Samson : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. संजू सॅमसन सीएसके (CSK) सामील झाल्यानंतर आता रियान पराग राजस्थानच्या नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी, १९ मार्च रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रियानला ‘संजू सॅमसनची जागा कशी भरून काढणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रियानने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
विराट-रोहितशी केली संजूची तुलना –
रियान पराग म्हणाला, “संजू भाईंसारख्या खेळाडूला रिप्लेस करण्याचा विचार आम्ही करत नाही. आम्ही फक्त त्या क्रमांकावर योग्य कौशल्य असलेला खेळाडू खेळवू शकतो. ज्याप्रमाणे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना रिप्लेस करणारा दुसरा खेळाडू मिळू शकत नाही, तसेच संजू भाईंच्या बाबतीत आहे. ते इतके महान खेळाडू आहेत की त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.”
💗 “Sanju Samson is IRREPLACEABLE.”
— Riyan Parag on Sanju Samson
Not just a player…
a leader, a match-winner, an emotion for Rajasthan Royals. 🏏✨Some names aren’t replaced…
they’re remembered, respected, and missed. 💔#SanjuSamson #RiyanParag #RR #IPL2026 pic.twitter.com/6MuLGpTuxz— ND Sport (@SportsByND) March 19, 2026
राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज –
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आणि कर्णधार राहिला आहे. त्याने ११ हंगामात १५० सामन्यांमध्ये ४००० हून अधिक धावा कुटल्या आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली २०२२ मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली होती. आता संजूच्या जागी आलेल्या रियान परागसमोर केवळ नेतृत्व सिद्ध करण्याचेच नाही, तर फलंदाजीतही संजूची उणीव भासू न देण्याचे मोठे आव्हान असेल.
यंदाच्या हंगामात संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थानने अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात घेतले आहे. ३० मार्च रोजी राजस्थानचा संघ आपल्या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तेव्हा रियान पराग ‘कॅप्टन कूल’ संजूचा वारसा किती समर्थपणे पुढे नेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





